
सदलगा : सदलग्यातील ऋषीतुल्य व्यक्तीमत्व कै. महादेव दामोदर जोशी यांच्या तब्बल ५५ ते ६० वर्षांपूर्वी लिहिलेल्या हस्तलिखित गीत कर्णायन या महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित गीत संग्रहाचे प्रकाशन आज शेंडा पार्क मधील चेतना विकास मंदिराच्या सभागृहात चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग. दि. माडगूळकर लिखित जसे गीत रामायण आहे त्याच धर्तीवर हे महाभारतातील महारथी कर्णाच्या जीवनावर आधारित गीत कर्णायन हा ४८ गीतांचा हा गीत संग्रह प्रकाशनाच्या प्रतिक्षेत असताना तब्बल ६० वर्षांनी कै. महादेव जोशी यांच्या या काव्यरचनाना पुत्र दिलीप जोशी यांच्या प्रोत्साहनाने नातू हिमांशू स्मार्त आणि अन्य नातवंडांच्या पुढाकाराने हा पुस्तक रुपी गीत संग्रह रावा प्रकाशनच्या राहुल कुलकर्णी यांनी मूर्त स्वरूपात वाचकांच्या समोर आणला.

यावेळी कै. महादेव जोशी यांचे पुत्र दिलीप जोशी, कन्या विशाखा स्मार्त, शुभदा जोशी, ज्योती देशपांडे या मुली, तसेच मकरंद द्रविड, संतोषकुमार संद्रे, प्रा. श्याम पोतदार यांनी कै. महादेव दामोदर जोशी यांचेविषयी त्यांच्या आठवणींनी ओतप्रोत भरलेली मनोगते व्यक्त केली.
हिमांशू स्मार्त यांनी प्रास्ताविक केले आणि राजेंद्र जोशी यांनी उपस्थित अभ्यागतांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta