
बेळगाव : तानाजी गल्ली येथील रेल्वे ट्रॅकवरील रस्ता वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे मंडळाने बंद केल्यामुळे स्थानिक रहिवाशांकडून तीव्र विरोध होत आहे. हा रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे.
तानाजी गल्लीचा हा रस्ता बंद केल्यामुळे परिसरातील दुकानदारांना, शाळकरी मुलांना आणि सामान्य नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत. लोकांना आता लांबच्या मार्गाने वळसा घालून जावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. हा रस्ता बाजारपेठेत जाण्यासाठी आणि मुलांना शाळा-कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी मुख्य मार्ग आहे. शहापूरला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता बंद केल्याने परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. जवळच्या गल्लीतून जाण्यासाठीही आता दुसरा मार्ग शोधावा लागत आहे, ज्यामुळे दोन्ही उड्डाणपुलांवर गर्दी वाढली आहे. लहान मुलांना शाळा-कॉलेजमध्ये पाठवताना पालकांना आता चिंता वाटत आहे, असे मत येथील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. लोकांचा विचार न करता अचानक रस्ता बंद केल्याने नागरिक आणि व्यापारी संतप्त झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta