Sunday , July 26 2026
Breaking News

कॉलेज रोडवर पार्क केलेल्या ३ कार आणि १ दुचाकींना इनोव्हा कारची धडक

Spread the love

 

बेळगाव : लिंगराज अरस कॉलेज रोड हॉस्पिटलसमोर काल मध्यरात्री दीडच्या सुमारास गोवा पासिंग एका कारने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या तीन कार आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली, यात सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोवा पासिंगची इनोव्हा कार भरधाव वेगाने आली आणि तिने हॉस्पिटलसमोर पार्क केलेल्या गाड्यांना धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने आणि पार्क केलेल्या गाड्यांमध्ये कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात तिन्ही कार आणि दुचाकी पूर्णपणे खराब झाल्या आहेत. बेळगावातील कॉलेज रोडवर घडलेल्या या अपघातामुळे रात्रीच्या वेळीही वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्रात ज्ञान व मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम

Spread the love    बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *