
बेळगाव : हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवण्याची निविदा आमच्या लक्षात येण्यापूर्वीच निघाली होती. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, हा प्रकल्प स्थगित करण्याचे निर्देश दिले होते, परंतु संबंधित विभागांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीला परवानगी दिली आहे आणि ते या विषयावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करतील.
ते बोलताना पुढे म्हणाले की, हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणी देण्यास बेळगावातील लोकांचा विरोध आहे. या प्रकल्पाला परवानगी देऊ नये अशी विनंती विविध संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर सरकारी पातळीवर चर्चा करतील.
निप्पाणी, हत्तरगी आणि संकेश्वरजवळ राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. गेल्या वेळी पावसामुळे सर्व्हिस रोड खराब झाला होता. एनएचआय अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली. यावेळीही, मला सर्व्हिस रोड खराब झाल्याचे लक्षात आले आहे. लवकरात लवकर सर्व्हिस रोड दुरुस्त करण्यात यावेत अशी सूचना देण्यात आल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यात दोन कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना बैठक घेण्यास सुचविले आहे. जिल्हा प्रशासनाने आधीच खबरदारीचे उपाय योजिले आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta