Thursday , March 5 2026
Breaking News

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “इ-वेस्ट” जनजागृती रॅलीचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जुन रोजी बेळगाव येथील रामनगर परीसरात घरोघरी आणि खानापूर येथील बाजारपेठेतील दुकानात जाऊन मराठा मंडळ कॉलेज आँफ फार्मासी बेळगाव या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी इ -वेस्ट (इलेक्ट्रॉनिक कचरा) याबाबत जनजागृती करून इ-वेस्ट गोळा केलं. यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये वाढत्या इ-वेस्ट समस्येबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

रॅलीची सुरुवात सकाळी १०.३० वाजता काँलेजच्या आवारापासून सूरूवात करत रामनगर परीसरातून फिरवण्यात आली. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, उपप्राचार्य डॉ. नागेश, को-ऑर्डिनेटर डॉ. प्रसन्ना सुतार, कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी त्याच बरोबर (D.pharmacy, B.pharmacy, M.pharmacy ) या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी बहुसंख्येने संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन आणि घोषणा देत “इ-वेस्टचा योग्य निपटारा करा”, पर्यावरण वाचवा” अशा घोषणा देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमाद्वारे नागरिकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करताना काळजी कशी घ्यावी, जुन्या वस्तूंचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती देण्यात आली.

त्याचबरोबर कॉलेजचे प्राध्यापक श्रीजीत पाटील आणि डॉ. कार्तिक खोत यांनी (D.pharmacy, B.pharmacy, M.pharmacy) या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह खानापूर शहरातील बाजारपेठेत दुकांदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून इ-वेस्ट संदर्भात जनजागृती केली.
या कार्यक्रमा बरोबरच मराठा मंडळ फार्मासी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी आर. एल्. एस् (RLS college) काँलेजमधे याच विषयावर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांमधे जनजागृती केली. कार्यक्रमाच्या शेवटी इ-वेस्ट व्यवस्थापन, संकलन याबाबत माहिती देण्यात आली आणि घराघरातून इ-वेस्ट संकलनाचा संकल्प करण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. श्रीमती राजश्री नागराजू यांची होती. या उपक्रमाबाबत सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *