Thursday , March 5 2026
Breaking News

अथणीजवळ अपघाताची मालिका; तिघांचा मृत्यू

Spread the love

 

अथणी : अथणीजवळ रात्री उशिरा अपघाताची मालिका घडली, त्यात तीन जण जागीच ठार झाले. विजयपुर-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गावर बणजवाड कॉलेजजवळ हा अपघात झाला.

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी गावातील महेश सुभाष गाथाडे (३०), शिरोळ तालुक्यातील पुढवाड गावातील शिवम युवराज चौहान (२४) आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर गावातील सचिन विलास माळी (४२) यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अथणी कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातांच्या मालिकेत एक लॉरी, एक पिकअप ट्रक, एक इनोव्हा आणि एक स्कॉर्पिओचा समावेश आहे. अथणी पोलीस ठाण्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

जखमींना वाचवण्यासाठी आलेल्याचा अपघातात मृत्यू

प्रथम, कागवाडहून अथणीकडे जाणाऱ्या लाल विटा वाहून नेणाऱ्या लॉरी आणि अथणीहून कागवाडकडे जाणाऱ्या पिकअप वाहनामध्ये अपघात झाला. जखमी पिकअप चालक आणि क्लीनर मदतीसाठी ओरडत होते. हे लक्षात येताच, स्कॉर्पिओ चालकाने आपले वाहन बाजूला केले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अथणीकडून येणाऱ्या एका इनोव्हा कारने जखमींना मदत करणााऱ्या चालकाला थेट धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *