
बेळगाव : देशात आणीबाणी लागू होऊन पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरातील महावीर भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार जगदीश शेट्टर, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य सी.टी. रवी, आ. अभय पाटील यांनी कार्यक्रमाला संबोधति केले. संविधानाला २५ वर्षे लागली तेव्हा देशात आणिबाणी लावण्यात आली, हा संविधानावील सर्वात मोठा हल्ला होता. इंदिरा गांधी यांनी संविधानाची मुस्कटदाबी केली. सध्या एका कुंटूंबाने काँग्रेस पक्षावर कब्जा केला आहे. सत्तेची भूक हाच काँग्रेसचा इतिहास, काँग्रेसने विविधतेत विराधोभास शोधला, त्यांच्या काळात देशाच्या एकतेवर अनेक हल्ले झाले आहेत. अशा शब्दात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. पुढे त्यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांना स्पर्श केला. भारताला लोकशाहीची जननी म्हणून ओळखंल जात. ही देशासाठी सन्मानाची बाब आहे. जेव्हा संविधानला ५० वर्षे लागली तेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी देशाला एकतेचा संदेश दिला. अशावेळी आम्ही गेल्या अकरा वर्षात संविधान बळकट केले. भाजपा सरकारने या देशातल्या सामान्य लोकांसाठी वन नेशन वन हेल्थ कार्ड, त्याचबरोबर वन नेशन वन रेशन, यासारख्या सामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या, असे विचारही व्यक्त करण्यात आले.
यावेळी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, अरविंद पाटील, आक्काताई इनामदार, दिलीप वर्णेकर, अनिल देशपांडे, आर.एस. मुतालिक, उज्वला बडवनाचे, रमेश देशपांडे, जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन मदम्मनवर, संदीप देशपांडे, धनश्री देसाई, राजशेखर डोणी, इरय्या खोत, रामचंद्र जोशी, विलास पवार आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta