Thursday , June 4 2026
Breaking News

हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका; उच्चदाबाच्या वीज प्रवाहामुळे उपकरणे, वायरिंग जळाली

Spread the love

 

बेळगाव : हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या वेळी केलेल्या चुकीमुळे हाय व्होल्टेज करंट अर्थात उच्चदाबाचा वीज प्रवाह निर्माण होऊन अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील कांही घरे आणि दुकानांमधील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अनगोळ येथील चौथ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या परिसरातील वीजपुरवठा काल रविवारी सकाळी खंडीत झाला होता. त्यामुळे विजेच्या खांबावरील आवश्यक दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमने दुपारी आपले दोन नवीन लाईनमन चौथा रेल्वे गेटच्या रस्त्याकडे पाठवले होते. तथापि दुरुस्ती करताना या नवीन लाईनमन्सनी वायरिंगची उलटसुलट चुकीची जोडणी केल्यामुळे मुख्य तारांमधून हायव्होल्टेज अर्थात विजेचा उच्चदाबाचा प्रवाह निर्माण झाला. या पद्धतीने अचानक उच्चदाबाचा वीज पुरवठा झाल्यामुळे जवळपासच्या सुमारे आठ – दहा घरे, दूध डेअरी, हॉटेल आणि दुकानांमधील टीव्ही, फ्रिज, पंखे, कॉम्पॅक्ट सिस्टीम, वीज मीटर, सीसी कॅमेरे वगैरे उपकरणे जळून मोठे नुकसान झाले.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *