

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या २३ व्या कार्यकाळासाठी विविध ४ स्थायी समित्यांच्या सदस्यांची निवडणूक बेळगाव महानगरपालिका सभागृहात होणार आहे.
७ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत विविध चार स्थायी समित्यांसाठी नामांकन स्वीकारले जातील. निवडणूक प्रक्रिया दुपारी ३ वाजता सुरू होईल, असे बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त आणि बेळगाव महानगरपालिकेचे अध्यक्ष (निवडणुका) एस.बी. शेट्टेन्नावार यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta