
बेळगाव : कर्नाटकातील चार प्रमुख विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली.
बेळगाव, हुबळी, मंगळुरू आणि बेंगळुरू या कर्नाटकातील विमानतळांना बॉम्ब स्फोट घडवून उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल
विमानतळांच्या संचालकांना पाठवण्यात आला. त्यामुळे सर्व विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. “रोडकिल क्यो” नावाच्या ईमेल आयडीवरून सदर धमकीचा संदेश पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांची आणि पर्यटकांची कडक तपासणी केली जात आहे. बॉम्ब पथके, स्निफर डॉग टीम, पोलिस आणि गुप्तचर अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
हुबळी विमानतळ संचालक रूपेशकुमार श्रीपाद यांनी बोलताना माहिती दिली की, विमानतळांभोवती सुमारे ५०-६० एकर जागेची झडती घेण्यात आली आहे आणि अधिकाऱ्यांना ईमेलची माहिती दिल्यानंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta