
बेळगाव : सरकारी मराठी मॉडेल शाळेत मंगळवार दिनांक 01/07/2025 रोजी मासिक पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या सर्व पालकांचे ईशस्तवन व स्वागत गीताने शाळेच्या विद्यार्थ्यिनी केले. यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एम्.एस्. मंडोळकर यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी यांनी केले. यामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, शाळा व शाळेमध्ये शौचालय स्वच्छता ठेवणे व इतर विषयावर पालक व शिक्षकामध्ये चर्चा करण्यात आली. काही विषायावर सर्वानुमते निर्णय घेऊन ठराव मंजूर करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी राजहंसगड गावातील डॉ. संतोष बोंगाळे, जयवंत पवार, राजू हलगेकर, महादेव करडी, मनोहर हलगेकर या शाळेच्या पालकानी 16 बेंच देणगी स्वरुपात दिले. या सभेमध्ये शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सातेरी पाखरे यांनी सर्वाचे आभार मानले या कार्यक्रमाला शाळेचे पालक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व सर्व एस्.डी. एम्.सी. उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta