
बेळगाव : जायंट्सच्या कर्नाटक शाखा द्वारा फेडरेशन 6 ची राज्यस्तरीय मल्टी युनिट कॉन्फरन्स येत्या रविवारी महिला विद्यालय, मराठी माध्यम शाळेच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि बेळगाव सखी यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परिषदेत कर्नाटकातील विविध ग्रुपचे 150 सभासद सहभागी होणार आहेत.
या परिषदेचे उद्घाटन जायंट्स डेप्युटी वर्ल्ड चेअरमन एम. लक्ष्मणन यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय समितीचे सदस्य दिनकर अमीन हे प्रमुख पाहुणे म्हणून तर कर्नाटक राज्य अध्यक्ष पी. तेजस्वीराव हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
या परिषदेत पाहुणे म्हणून ज्योती व्यंकटेश, गजानन निलगिरी, ए. किनी व ओबीडी अशोक हे स्पेशल कमिटी मेंबर्स आणि युनिट एक चे संचालक शिवानंद हिरेमठ हे उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत विविध विषयावर परिसंवाद व चर्चा होणार आहे. असे दोन्ही संघटनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta