Sunday , July 26 2026
Breaking News

सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री बाल शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक वाय.सी. गोरल सर होते व प्रमुख वक्त्या म्हणून ॲड. सरिता सतीश पाटील उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून सभेची सुरुवात झाली. व्हा. चेअरमन सतीश पाटील यांनी प्रस्ताविक केले व महेश पाटील यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला तर चेअरमन राजकुमार पाटील यांनी सोसायटीच्या मागील वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला व भागधारकांना 12% लाभांश देण्याची घोषणा केली.

संचालक गजानन उघाडे यांनी नफा तोटा पत्रकाचे वाचन केले. सोसायटीच्या व्यवस्थापिका लक्ष्मी पाटील व क्लार्क नितेश मजुकर यांनी मागील आर्थिक वर्षातील ठरावांचे वाचन केले. संचालक बबन कुगजी आणि सत्यजित पाटील यांनी ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. 2025-26 आर्थिक सालच्या अंदाजपत्रकाचे वाचन संचालक राघवेंद्र सुतार यांनी केले. ज्येष्ठ संचालक प्रदीप मेणसे यांनी नफा विभागणी पत्रकाचे वाचन केले व सी.एन. कर्लेकर यांनी संस्थेच्या मागील 5 वर्षाचा अंतरिम अहवाल मांडला. यावेळी सोसायटीच्या वतीने क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विविध खेळाडूंचा व दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात सहभाग घेतल्याबद्दल कु. रसिका कंग्राळकर हिचा तसेच मार्च 2025 सालच्या दहावी परीक्षेत गावातील प्रत्येक हायस्कूलमधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आणि सन 2024-25 सालाकरीता संस्थेसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संचालक बबन कृष्णा कुगजी यांना विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच विद्यमान संचालकांच्या उर्वरित कार्यकाळासाठी विद्यमान चेअरमन राजकुमार पाटील आणि व्हा. चेअरमन सतीश पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाला सोसायटीचे सर्व संचालक मंडळ, सल्लागार, मार्गदर्शक, भागधारक, महिला व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन चेतन हुंदरे यांनी केले व पांडुरंग निलजकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *