
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यातर्फे आज शनिवार दि. 19 मार्च 2022 रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा सोनोली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी युवा समितीचे पदाधिकारी सिद्धार्थ चौगुले यांनी उपक्रमा बद्दल माहिती दिली, मराठी भाषा, संस्कृती टिकवायची असेल तर मराठी शाळा जगणे काळाची गरज बनली आहे आणि त्याची जाण ठेवून युवा समिती कार्यरत असे मत मांडले. गावातील समितीचे ज्येष्ठ अनिल झंगरुचे यांनी युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले, मराठी भाषेबद्दल समितीची आपुलकी त्यांनी व्यक्त केली, यावेळी एसडीएमसी अध्यक्ष संजय पाटील, युवा समितीचे हितचिंतक सागर झंगरूचे, रमेश झंगरूचे, भाऊ कडोलकर उपस्थित होते,
श्रीमती कुलकर्णी टीचर यांनी सूत्रसंचालन केले तर पाटील टीचर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta