
बेळगाव : मराठा बँकेची 83 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा मंदिर येथे कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
प्रारंभी बँकेचे चेअरमन श्री. बाळाराम पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले व प्रास्ताविक भाषणात स्पर्धात्मक बँकिंग क्षेत्रामध्ये आपल्या बँकेने केलेल्या प्रगतीबाबत उपस्थित सभासदांना माहिती दिली. तसेच 2024-2025 च्या सरकारी लेखा परिक्षणानुसार बँकेला ऑडीट वर्ग “अ” मिळालेला आहे व बँकेला यावर्षी निव्वळ नफा रु. 2 कोटी 48 लाख झाला असल्याचे सांगितले. यावेळी सभासदांच्यावतीने सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
बँकेचे जनरल मॅनेजर श्री. संतोष धामणेकर यानी 31 मार्च 2025 अखेर अहवालाचे तसेच इतर सभेपुढील विषय वार्षिक अहवाल, ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रक, नफा विभागणी, अंदाज पत्रक, अन्य विषयांचे तपशीलवार वाचन करुन सविस्तर माहिती दिली.
बँकेचे सभासद सर्वश्री मालोजीराव अष्टेकर, नारायणराव खांडेकर, अमित देसाई, ईश्वर लगाडे, देवकुमार बिर्जे, व्यंकटेश हिशोबकर, ऍड. सुधीर चव्हाण, शरद पाटील, दिनेश शिरोडकर, कांचन बेळगांवकर, मोतेस बेळगांवकर व इतरानी चर्चेमध्ये भाग घेऊन एकमताने अहवालाला मंजुरी दिली.
यावेळी बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, एल. एस. होनगेकर, दिगंबर पवार, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, मोहन बेळगुंदकर, विनायक होनगेकर, सौ. रेणू किल्लेकर, प्रशांत चिगरे, विश्वजीत हसबे, अशोक कांबळे, लक्ष्मण नाईक, बी. बी. खंडागळे, जयराज मोदगेकर, सी. ए. शिवकुमार शहापूरकर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी व्हा. चेअरमन श्री. शेखर हंडे यानी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta