
बेळगाव – केजीबी स्पोर्ट्स आयोजित श्री गणेश ट्रॉफी 46 वे सिंगल विकेट क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजक एसपी ऑटो ॲक्सेसरीज यांच्याकडून आयोजन करण्यात आले आहे. सलग 45 वर्षे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असून या स्पर्धेनंतर बेळगाव मधील क्रिकेट हंगामाला सुरुवात होते.
यावर्षी सरदार हायस्कूल मैदानावर गुरुवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8 आठ वाजता स्पर्धेचे उद्घाटन कंग्राळ गल्लीतील पंचमंडळ, गणेशोत्सव मंडळ केजी स्पोर्ट्सचे फाउंडर मेंबर्स व माजी खेळाडू तसेच एसपी कार ॲक्सेसरीजचे संचालक यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी बेळगाव येथील सर्व क्रिकेट संघानी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मैदानात उपस्थित राहावे तसेच आपली नावे नोंदवावी. पहिल्या 64 खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्यास प्राधान्य देण्यात येईल याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी आणि नव नोंदणीसाठी आयोजक पंकज ज्योतिबा पाटील 9844364332, अनिल यल्लाप्पा पाटील 9663007586, विनायक उर्फ शाहू अनंत निळकंठ्याचे 7899506741 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta