
बेळगाव : शनिवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर शहराच्या बाहेरील भागात पोलिसांनी दरोडा, सामूहिक बलात्कार आणि बेकायदेशीर शस्त्रे यासारख्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपीला पायावर गोळी झाडून अटक केली.
आज सकाळी ६ वाजता आरोपी रमेश किल्लार याला अटक करण्यासाठी पोलिस कर्मचारी गेले असता पोलीस हवालदार शरीफ दफेदारवर चाकूने मारहाण करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पीएसआय प्रवीण गोंगोळी यांनी हवेत गोळी झाडून पहिल्यांदा शरण येण्याचा इशारा दिला, परंतु आरोपीने न जुमानता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पीएसआय गोंगोळी यांनी त्याच्या पायावर गोळी झाडून जखमी केले आणि ताब्यात घेतले.
जखमी आरोपीला बेळगाव बीआयएमएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही घटना कित्तूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Belgaum Varta Belgaum Varta