Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना

Spread the love

 

बेळगाव : मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मोर्चाला पाठिंबा देऊन प्रत्यक्षात मोर्चात सहभागी होण्यासाठी बेळगाव येथून सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईला आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी रवाना झाले. उद्या 1 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई येथे मोर्चास्थळी श्री. मनोज जरांगे पाटील यांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठिंबाचे पत्र देण्यात येणार आहे. शिष्टमंडळात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी नगरसेवक राजू बिरजे, मोतेश बारदेशकर, अनंत पाटील, कृष्णा पन्हाळकर, अजय खलाटे पाटील, शिवम पन्हाळकर, राजेंद्र बैलूर, विनायक बिरजे, ओमकार पन्हाळकर, गणेश शिंदोळकर आदी आहेत.

याप्रसंगी अंकुश केसरकर, चंद्रकांत कोंडुसकर, प्राचार्य आनंद आपटेकर, राजकुमार मोरे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *