Monday , September 21 2026
Breaking News

आयुक्त भुषण बोरसे यांच्या हस्ते श्री बेळगावचा राजांची आरती…

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चव्हाट गल्ली बेळगाव येथील बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची आरती शुक्रवारी रात्री आठ वाजता श्रीच्या मंडपात मोठ्या जल्लोषात पोलीस आयुक्त भुषण बोरसे यांच्या हस्ते श्री गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. यावेळी “गणपती बाप्पा मोरया” बेळगावचा राजा च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता

गणेशोत्सव हा युवकांना व नागरिकांसाठी एकात्मतेचा, भक्तीचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव ठरत असून या गणेशोत्सवात शांततेचे वातावरण व उत्साही आहे. आपण सर्वांनी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला पाहिजे परंतु आपण प्रशासनाच्या सुद्धा नियमांचे पालन देखील केले पाहिजे, जे खूप महत्वाचे आहे.” असे यावेळी पोलीस आयुक्तांनी युवकांच्या समोर आपलं मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुनिल यांनी सांगितले दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून चव्हाट गल्लीतील श्रीच्या मंडपात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

या प्रसंगी प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, सुनिल जाधव, दिगंबर पवार, प्रज्वल पाटील, प्रवीण धामनेकर, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, विनायक पवार, अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, भरत काळगे, अनंत बामणे, रोहन जाधव, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, राहुल जाधव, संजय रेडेकर, उमेश मेणसे यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *