Sunday , July 26 2026
Breaking News

पंधराशे विद्यार्थ्यांनी केली बेळगावचा राजांची महाआरती

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवाचे औचित्य साधून प्रतिवर्षी प्रमाणे मराठा मंडळ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बेळगावचा राजाची विधीवत महाआरती केली याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मार्फत गणपतीची महाआरती हि परंपरा जपत बेळगावचा राजा चव्हाट गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विद्यार्थी मार्फत पूजा विधी पार पाडला. यावेळी ताल-वाद्यांच्या मंगलमय तालावर आरती करत पवित्र असे वातावरण निर्माण करण्यात मंडळाने यश मिळविले. याप्रसंगी जीएसटीचे अधिकारी शिवा पाटील, मराठा मंडळ संस्थेचे संचालक रामचंद्र मोदगेकर, सकल मराठा समाज्याचे समन्वयक गुणवंत पाटील, बेळगाव रुरल सोसायटी संचालक किसन रेडेकर, रमेश मोदगेकर, समाजसेवक राजू तुडयेकर, अजिंक्य पाटील, बीएससी मॅनेजर अमजद जमादार, इराणासर उपस्थित होते.

याप्रसंगी गुणवंत पाटील यांनी गणपती विद्येच्या देवते बरोबर चौष्ट कालाचाही अधिष्ठाता आहे. माणसाला निरामय जगायचं असेल तर त्याला ज्ञाना बरोबरच छंद म्हणून एखाद्यी कला अवगत असायला पाहिजे. यानंतर बीएससी मॅनेजर अमजद जमादार, यांनी मणांसाचा उद्देश चांगला असेल तर त्याला देवाचीही साथ लाभते आपण आयुष्यात चांगलं माणूस बनण्याचे प्रयत्न केला पाहिजे.
रामचंद्र मोदगेकर यांनी बोलताना सांगितले, निलजी गाव व चव्हाट गल्लीचे ऋणाबंध खूप जुनी आहेत. आजच्या प्रसंगी त्याचीही उजळणी होत आहे.

या प्रसंगी प्रताप मोहिते, विश्वजित हसबे, उत्तम नाकाडी, श्रीनाथ पवार, सुनिल जाधव, विनायक पवार, निखिल गुंडकल, निशा कुडे, अभिषेक नाईक, सत्यम नाईक, वृषभ मोहिते, भरत काळगे, अनंत बामणे, रोहन जाधव, सौरभ पवार, हर्षल नाईक, महिंद्र पवार, निखील पाटील, रोहन जाधव, संदीप कामुले, सौरभ बामणे, संजय रेडेकर, उमेश मेणसें यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *