बेळगाव : श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून शांताई वृद्धाश्रमाच्या सहकार्याने श्री कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित परिसरातील सुमारे 50 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
श्री कपिलेश्वर चौक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित आदर आणि जिव्हाळ्याने भरलेल्या या समारंभामध्ये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा शाल, फुले आणि त्यांच्या दैनंदिन आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक विशेष औषध पेटी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला. हा समारंभ कपिल भोसले, पप्पू लगडे, दीपक जाधव, अशोक जाधव, संजय वालावलकर, विनायक जाधव, राहुल पाटील, आकाश हुलियार, संतोष देवर, यशवंत राजपूत, श्री जाधव, अरविंद देवर, सुधीर यादव अरुण कुलाल आणि यंग बेळगाव फाउंडेशनचे अध्यक्ष ॲलन विजय मोरे यांच्या सक्रिय सहभागाने मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी निमंत्रितांसह हितचिंतक, मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेश भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta