बेळगाव – बेळगाव सीमा भाग कर्नाटकाचा भाग असल्याचे दर्शविण्यासाठीच कर्नाटक सरकारने हलगा येथे तब्बल 500 कोटी रुपये खर्च करून सुवर्णसौध उभारले. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन केवळ हिवाळी अधिवेशनात दहा दिवसांसाठी सुवर्णसौध वापर करण्यात येतो. राज्य सरकार साठी पांढरा हत्ती तर इतर वेळी भूत बंगला स्थित उभ्या असलेल्या सुवर्णसौध इमारतीचे सहा महिन्यांचे विजेचे बिल थकले असून 1 कोटी 20 लाख रुपये भरण्यासाठी हेस्कॉमने नोटीस पाठवली आहे. महिन्याभरात थकीत बील भरावे, अन्यथा जोडणी कापण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंच हमी योजनेचा परिणाम बेळगावमधील पांढरा हत्ती असलेल्या सुवणसौधवरही होत आहे. सुवर्णसौध इमारतीच्या देखभालीसाठी निधी राज्य सरकारने निष्काळजीपणा दाखवला आहे. देखभाल निधीअभावी आधीच अडचणीत असलेल्या सुवर्णसौधला आता हेस्कॉमने शॉक दिला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta