Thursday , June 4 2026
Breaking News

एकाच कुटुंबातील ६ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; चार जणांचा मृत्यू

Spread the love

 

बिदरमध्ये दुर्दैवी घटना

बिदर : बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील मारूरजवळ एक भयानक दुर्घटना घडली. चार मुले आणि एका जोडप्यासह एकूण ६ जणांनी कारंजा जलाशयाच्या कालव्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. ६ पैकी चार जणांचा मृत्यू झाला, तर दोघांना स्थानिकांनी वाचवले. मैलूर येथील वडील शिवमूर्ती (४५), श्रीकांत (८), ऋतिक (४) आणि ७ महिन्याचे लहान बाळ राकेश यांचा मृत्यू झाला तर सुदैवाने आई रमाबाई (४२) आणि मुलगा श्रीकांत (७) हे बचावले.
आत्महत्या करण्यासाठी या जोडप्याने त्यांच्या चार मुलांसह कालव्यात उडी मारली आणि वडील आणि लहान मुलाचा कालव्यात मृत्यू झाला. स्थानिकांनी आई आणि दुसऱ्या मुलाला वाचवण्यात यश मिळवले. कर्जामुळे संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचा संशय आहे.
पोलिस अधिकारी आणि मंत्री ईश्वर खंड्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या बिदर जिल्हाध्यक्षपदी तुकाराम मोरे यांची निवड

Spread the love  धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *