
बेळगाव : कर्नाटक सरकारकडून राज्यात जात जनगणना केली जाणार आहे. यामुळे गणतीवेळी मराठा समाजाने व्यवस्थितरीत्या माहिती देणे गरजेचे आहे. सर्वेक्षणात ‘कुणबी’ असा उल्लेख केल्यास कोणताही गैरसमज होण्याचे कारण नाही. कोणत्याही निकषाची पर्वा न करता मराठा समाजाने या सर्वेक्षणाच्या फाॅर्म मध्ये धर्म-हिंदू, जात-मराठा, पोटजात- कुणबी व मातृभाषा-मराठी अशीच नोंद करावी याचा फायदा आपल्या मुलांना भविष्यात नक्की होईल, असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळ, बेळगांवचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे केले आहे.
पान नं. 5 वरील, संख्या 8 मध्ये धर्म-हिंदू , संख्या 9 मध्ये जात-मराठा, संख्या 10 मध्ये पोटजात -कुणबी तसेच
पान नं. 6 वरील संख्या 15 मध्ये मातृभाषा-मराठी असे भरून द्यावी ही विनंती.
Belgaum Varta Belgaum Varta