Monday , December 8 2025
Breaking News

हिंदी भाषा भारतीय संस्कृतीचे हृदयस्पंदन : डॉ. प्रो. सिताराम के. पवार

Spread the love

 

बेळगाव : हिंदी भाषेला प्राचीन इतिहास आहे. हिंदी भाषेला निश्चितच एक प्राचीन इतिहास आहे, जो संस्कृत भाषेच्या मुळाशी जोडलेला आहे आणि साधारणपणे एक हजार वर्षांहून अधिक जुना आहे. संस्कृत, प्राकृत आणि अपभ्रंश भाषांमधून विकसित होऊन हिंदी भाषेचा पाया घातला गेला. हिंदी आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय भाषा आहे, असे प्रतिपादन कर्नाटक विश्वविद्यालय धारवाडचे हिन्दी विभाग अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर सिताराम के. पवार यांनी केले. ते बेळगाव येथील के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयामध्ये आयोजित हिंदी दिवस समारोह समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ अध्यक्षस्थानी होत्या, हा समारोह लिंगराज महाविद्यालयाच्या केंद्रीय सभागृहात आयोजित केला गेला होता. व्यासपीठावर लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी आणि हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. अर्जुन कांबळे उपस्थित होते.

यावेळी मुख्य अतिथी डॉक्टर प्रोफेसर सिताराम के. पवार यांनी हिंदी साहित्य, कविता, नाटके आणि चित्रपट यांमधून भारतीय संस्कृतीचा कसा प्रचार होतो आणि हिंदी चित्रपटसृष्टी बॉलीवूडमुळे हिंदीला जागतिक स्तरावर लोकप्रियता कशी मिळाली आहे. हे मनोरंजन पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या समारोहाची सुरुवात कु. प्रज्ज्वल नेर्लीकर आणि कु. पृथ्वी नेर्लीकर यांच्या स्वागतगीताने झाली. या समारंभाचे प्रास्ताविक और स्वागत भाषण प्रा. अर्जुन कांबळे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पानी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या समारंभाचे प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी यांनी केले. प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी यांचे स्वागत प्रा. अर्जुन कांबळे यांनी केले. लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ यांचे स्वागत प्रा. सीमा जनवाडे यांनी केले.
कुमारी उमेहनीन पठाण हिने हिंदी भाषेसंबंधी भाषण केले. कु. श्रेया हासीलकर हिने सुभद्राकुमारी चौहान लिखित झाशी की रानी कविता सादर केली. कु. गुंजन येळ्ळूरकर हिने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ म्हणाल्या की, हिंदी ही भारताची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला भारताची राजभाषा म्हणून मान्यता देण्यात आली. भारतासारख्या बहुभाषिक देशात विविध प्रांतांतील लोकांमध्ये संवाद साधण्यासाठी हिंदी एक प्रभावी माध्यम आहे.ती उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत व पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत लोकांना जोडते.

प्रमुख पाहुणे कर्नाटक विश्वविद्यालय धारवाडचे हिन्दी विभाग अध्यक्ष डॉक्टर प्रोफेसर सिताराम के. पवार यांचा पुस्तक आणि शाल देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तनाज जालीकोप, कु.पुष्पा नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु.यशोदा हिने केले. यावेळी प्रेमचंद क्लबतर्फे कु. सिमरन बागवान कु. अर्फा मुजावर, कु. मसीहा इनामदार, कु. दीपिका राठोर, सानिया बागवान, कु.सादिया गुराडी, कु.प्रतिक्षा सुतार, कु.विद्या पुजार, कु.प्रगती एकबोटे, कु.शाजिया बिजापुर ह्या विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांच्या सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय पंच परमेश्वर या कथेवर आधारित नाटक सादर केले. या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी प्रा सीमा जनवाडे, डॉ. कलावती निंबाळकर, प्रा. सूरज हत्तलगी यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव यांची निवड

Spread the love  सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बेळगाव : १७७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *