Monday , September 21 2026
Breaking News

प्रगती मल्टीपर्पज सोसायटीला 10 लाख 61 हजार रुपये नफा

Spread the love

 

बेळगाव : महात्मा फुले रोड शहापूर बेळगाव येथील प्रगती मल्टीपर्पज सौहार्द सहकारी संघ नियमित या सोसायटीची 16 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन अजित पाटील होते. प्रारंभी सोसायटीचे चेअरमन अजित पाटील, व्हा. चेअरमन परशुराम रायबागी व संचालक मंडळांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सुरुवातीला संचालक वामन जाधव यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना चेअरमन अजित पाटील म्हणाले, संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व संचालकांनी एकजुटीने कार्यरत राहिले पाहिजे, सहकारी संस्थेत विश्वासाहर्तता फार महत्त्वाची असून, संचालक, सभासद व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने संस्थेचा नावलौकिक वाढतो. तसेच संस्थेला यावर्षी 10 लाख 61 हजार रुपये इतका नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सभासदांना यावर्षी 15 टक्के लाभांश देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. सध्या सोसायटीकडे 6 कोटी 87 लाखांच्या ठेवी, दोन कोटी 36 लाखांची गुंतवणूक, तर 4 कोटी 68 लाखांचे कर्ज वितरित केले आहे. संस्थेच्या सेक्रेटरी शोभा मणगुती यांनी नफा तोटा, ताळेबंद व अंदाजपत्रकाचे वाचन केले. सभेला व्हा. चेअरमन परशुराम रायबागी, संचालक वामन जाधव, नारायण पाटील, परशुराम संभाजी, परशराम गोडसे, मनोहर निलजकर, विनय धामणेकर, सौ. स्वाती धामणेकर, सोसायटीचे लेखापरीक्षक आर. व्ही. देशपांडे, सल्लागार ॲड. सुनील सक्री, सभासद तसेच हितचिंतक उपस्थित होते.शेवटी संचालक विनय धामणेकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *