

बेळगाव : यंदाचा नवरात्र – दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी बेळगावचे सर्व देवस्थान मंडळाचे हक्कदार, पंचमंडळ, युवक यांची महत्त्वपूर्ण बैठक आज शनिवार दिनांक 20.09.25 रोजी सायंकाळी ठीक 6.00 वा. रामलिंगखिंड गल्ली श्री जत्तीमठ देवस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीत यंदाच्या अकराव्या दिवसाच्या नवरात्र दसरा महोत्सवातील शेवटच्या दिवशी 02 ऑक्टोबर रोजी मराठी विद्यानिकेतन या मैदानावरील विविध शासनकाठी, देवस्थानाच्या पालख्या व महाआरती तयारी संदर्भात विशेष चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व संबंधित महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याने हा उत्सव मोठ्या परंपरेनुसार साजरा करण्याकरिता आपले विचार मांडावेत अशी विनंती महामंडळाच्या वतीने सर्व संबंधितांना एका विशेष पत्रकाद्वारे मंडळाच्या कार्यकारी सचिव यांनी केली आहे. महामंडळाचे गौरव अध्यक्ष श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. रमाकांत (दादा) कोंडुस्कर हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta