
बेळगाव : सांबरा येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या रस्ता रोको प्रकरणी माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2018 साली अतिवृष्टी झाल्याने सांबरा विमानतळाच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या बाजूला शेतकऱ्यांचा रस्ता पावसाने उध्वस्त झाला होता. सदर रस्ता व्हावा यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने सांबरा रास्ता रोको केला होता. या रस्ता रोको आंदोलनानंतर ग्रामपंचायत सदस्य आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य नागेश देसाई आदींवर मारिहाळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेळगाव कोर्टात त्याची सुनावणी होऊन सर्वांना याप्रकरणी निर्दोष ठरविण्यात आले.
नागेश देसाई, लक्ष्मण कोल्हे, पागोड गजानन पाटील, यल्लाप्पा सुळेभावी, मदन आप्पायाचे, लक्ष्मण टिपानाचे, महेश जत्रा, भावकान्ना बसरीकट्टी आणि उमेश धर्मोजी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. वकील म्हणून सुधीर कडोलकर यांनी काम पाहिले.

Belgaum Varta Belgaum Varta