बेळगाव : येथील मराठा मंडळ फार्मासी कॉलेजमध्ये आज “फार्मासिस्ट डे” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे माजी विद्यार्थी मा. दत्ता तरळे उपस्थित होते. या प्रसंगी त्यांच्या हस्ते प्राध्यापकांना स्कील इंडिया सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचे महत्त्व पटवून देत कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहभागातून जनजागृती रॅली काढण्यात आली. “आरोग्य सेवेत फार्मासिस्टचे योगदान” या विषयावर घोषवाक्ये देत रॅलीतून जनतेत जागृतीचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे ऑर्डिनेटर म्हणून कॉलेजे उप प्राचार्य डॉ. नागेश सी. यांनी काम पाहिले तर सूत्रसंचालन शितल कामटे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta