Monday , September 21 2026
Breaking News

जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : जायंट्स सोशल वेल्फेअर असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिवराज पाटील होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील व ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य मोहन कारेकर उपस्थित होते.
प्रारंभी शिवराज पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी खजिनदार अशोक हलगेकर यानी मागील सर्व साधारण सभेचे अहवाल वाचन करून 2024-25 सालचा जमाखर्च सादर करून त्यास मंजुरी घेतली. यावेळी 2025-26 सालासाठी लेखा परीक्षक (C.A.) म्हणून मठपती व कंपनी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. मोहन कारेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी 2025-26 सालासाठी अध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, उपाध्यक्ष उमेश पाटील, सेक्रेटरी मदन बामणे व खजिनदार संजय पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत विश्वास पवार, अशोक हलगेकर, अविनाश पाटील, मुकुंद महागावकर, मदन बामणे, मधू बेळगावकर, राहूल बेलवलकर, संजय पाटील (नंदिनी) सुनिल मुतगेकर, शिवकुमार हिरेमठ यांनी भाग घेतला. शेवटी संजय पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *