Thursday , March 5 2026
Breaking News

न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची मागणी

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा न्यायालय आवारात आपत्कालीन वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी बार असोसिएशन बेळगाव यांच्याकडे केली आहे. जिल्हा न्यायालय आवारात वकील, आरोपी, पोलीस, साक्षीदार, अशिलांचा वावर असतो. नेहमीच हा परिसर गजबजलेला असतो. न्यायालय आवारात एखाद्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याच्या घटना घडत असतात. त्यावेळी तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध न झाल्यामुळे अलीकडे काहींच्या जीवावर देखील बेतले आहे. नुकताच बेळगाव जिल्हा कोर्ट आवारात ज्येष्ठ वकील पी. एस. पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. त्याचप्रमाणे कौटुंबिक न्यायालयामध्ये पती-पत्नीच्या वादाच्या सुनावणीच्या वेळी देखील पतीला भोवळ आली व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच लहान-मोठ्या दुखापती झाल्याच्या घटना देखील न्यायालयीन आवारात घडल्या आहेत. न्यायालय आवारात जिल्हाधिकारी कार्यालय त्याचप्रमाणे इतर शासकीय कार्यालय देखील आहेत त्यामुळे या भागात नागरिकांची बरीच वर्दळ असते. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी देखील नागरिक ये-जा करीत असतात अशावेळी आपत्कालीन घटना टाळण्यासाठी न्यायालयीन आवारात रुग्णवाहिकेसह आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक युद्धपातळीवर तैनात करण्यात यावे, अशी मागणी ऍड. शामसुंदर पत्तार आणि ऍड. मारुती कामाण्णाचे यांनी एका निवेदनाद्वारे बेळगाव बार असोसिएशनकडे केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *