

ठाणे : “बेळगाव कुणाच्या बापाच,ते मराठी माणसांच्या हक्काचं” या पुस्तकाचे युवा साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांनी सातारा येथे भरणाऱ्या ९९ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि आपले गुरूवर्य सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या समोर बेळगाव सीमा प्रश्नावर सातारा येथे भरणाऱ्या साहित्य संमेलनात ठोस चर्चा व्हावी. बेळगाव सीमा भागाविना संयुक्त महाराष्ट्र अधुरा आहे. बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन पिढ्या सातत्याने महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आल्या आहेत.आता चौथीही पिढी संघर्ष करायला सज्ज आहे. ‘मरेगे तो भी महाराष्ट्र में, जियेगे तो भी महाराष्ट्र में’ हे सीमा भागातील मराठी जनतेचे ब्रीद वाक्य आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी शहीद झालेल्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाला सार्थ अभिमान वाटावा. कर्नाटक सरकारची बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेवर भाषेवर दादागिरी सुरू असून अनेक समस्याशी तेथील जनता लढा देत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संमेलनात ठोस चर्चा व्हावी’ अशी खंत जाधव यांनी व्यक्त केली.
विश्वास पाटील यांची सातारा येथे भरणाऱ्या ९९ वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांनी सत्काराचे आयोजन केले होते.
Belgaum Varta Belgaum Varta