Monday , September 21 2026
Breaking News

महामेळावा खटला सुनावणी लांबणीवर; पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक सरकारने सुवर्णसौध येथे अधिवेशन घेतले त्याला विरोध म्हणून मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने महामेळाव्याचे २०१७ मध्ये आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला परवानगी घेतली नाही, म्हणून म. ए. समितीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी शुक्रवार दि. ३ रोजी येथील जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये होती. मात्र, ती सुनावणी पुन्हा पुढे ढकलली असून पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दीपक दळवी, माजी आ. मनोहर किणेकर, माजी आ. दिगंबर पाटील, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, विकास कलघटगी यांच्यावर टिळकवाडी पोलिस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची सुनावणी सुरू आहे. आता २५ ऑक्टोबर रोजी २०१६ आणि २०१७ या दोन्ही मेळाव्याच्या सुनावणी एकाचवेळी होणार आहे. या खटल्यामध्ये म. ए. समितीच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. बाळासाहेब कागणकर हे काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *