Monday , September 21 2026
Breaking News

खडक गल्ली परिसरात दगडफेक

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात शुक्रवारी रात्री दोन गटात धार्मिक वाद उसळून दगडफेकीची घटना घडली.

दरवर्षी, शनिवारी खुंट आणि जलगार गल्लीमार्गे उरूस मिरवणूक काढण्यात येते. मात्र या वर्षी परवानगीशिवाय मिरवणूक खडक गल्लीत दाखल झाली. या परिसरात कधीही न आलेली मिरवणूक आता का आली आहे? असे काहींनी विचारले असता दोन गटात तणाव निर्माण होऊन दगडफेकीचा प्रकार सुरू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नारायण बरमणी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. सदर घटना खडेबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, खडक गल्लीमध्ये दोन समुदायांमध्ये वाद झाला. आज धार्मिक कार्यक्रम होता. त्यासाठी ठराविक मार्ग निश्‍चित करण्यात आला होता. मात्र काही जण त्या मार्गाऐवजी दुसऱ्या मार्गाने आले. स्थानिकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आणि त्यातून वाद निर्माण झाला. ज्यांनी चूक केली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कुणालाही दुखापत झालेली नाही. दोन्ही समुदायातील ज्येष्ठांनी तात्काळ मध्यस्थी करून वाद मिटवला. मूळ मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाने जाणे चुकीचे झाले, असेही त्यांनी मान्य केले असल्याचेही सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *