Thursday , March 5 2026
Breaking News

सकल मराठा समाजाच्या वतीने खेळाडू आणि श्रुती पाटीलचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : कित्येक दशकानंतर बेळगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल करत मैसूर दसरा स्पर्धेत ‘दसरा कर्नाटक कंटीराव केसरी 2025’ हा पुरस्कार मिळवलेल्या पैलवान कामेश पाटील यांच्यासह या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या दहा युवा पैलवानांचा आणि कर्नाटक राज्य पोलीस दलाच्या पोलीस उपनिरीक्षक स्पर्धेत यश मिळवलेल्या श्रुती पाटील यांचा सत्कार सकल मराठा समाज बेळगाव यांच्यावतीने करण्यात येणार आहे.

रविवार दि. 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठा समाजाचे देवस्थान श्री जत्तीमठ बेळगाव येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकताच काडा अध्यक्ष पदी निवड झालेल्या युवराज कदम यांचा देखील ठिकाणी सत्कार केला जाणार आहे.

युवा कुस्तीपटूंना प्रोत्साहन आणि पोलीस उपनिरीक्षक या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवून बेळगावचे नाव उज्वल केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक श्रुती पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे. बेळगाव सकल मराठा समाज बांधवांनी सत्कार समारंभाला उपस्थित राहून खेळाडूंना सत्कारमूर्तींना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने किरण जाधव, प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील आणि नागेश देसाई आदींनी केले आहे.

मैसूर दसरा स्पर्धेत पैलवान कामेश पाटील (कंग्राळी खुर्द), पैलवान प्रेम जाधव (कंग्राळी खुर्द), पैलवान महेश बिर्जे (तीर्थ कुंडये),
पैलवान विनायक पाटील (येळ्ळूर), पैलवान समर्थ डुकरे (किणये), पैलवान स्वाती पाटील (कडोली), पैलवान प्रांजल तुळजाई (अवचारट्टी), पैलवान भक्ती पाटील (कंग्राळी), पैलवान सानिका हिरोजी (कलखांब) आणि श्रावणी तरळे (आंबेवाडी), (आंबेवाडी), अनुश्री चौगुले (अलतगा) या पैलवानांचा सत्कार केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *