
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील देवेंद्रनगर येथील देवेंद्र जिनगौडा पदवीपूर्व कॉलेजमधील विद्यार्थिनींचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक शहर पाणीपुरवठा महामंडळाच्या संचालिका दीपा कुडची उपस्थित होत्या. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर दीपा कुडची यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात दीपा कुडची म्हणाल्या की, आजची मुले ही देशाचे भावी नागरिक असून विद्यार्थी जीवनातील हे सोन्याचे दिवस आहेत. हा काळ वाया न घालवता त्याचा चांगल्या प्रकारे विनियोग करून घेऊन तुमची भावी स्वप्न साकार करा. बेळगाव ग्रामीण भागामध्ये ही संस्था स्थापन करून संस्थाचालकांनी या भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची चांगली सोय केली आहे असे सांगून दीपा कुडची यांनी संस्थेच्या अध्यक्षांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, ग्रा. पं. सदस्य सतीश शहापूरकर, गोपाळ जिनगौडा, संदीप चिपरे आदिंसह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta