Thursday , June 4 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी नेताजी जाधव

Spread the love


बेळगाव : 174 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ. सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली.
प्रसन्न हेरेकर यांची उपाध्यक्ष पदी तर मानद कार्यवाह पदी रघुनाथ बांडगी, सहकार्यवाह पदी लता पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
निवडीचा ठराव अभय याळगी यांनी मांडला तर प्रा. विनोद गायकवाड यांनी अनुमोदन दिले.
यावेळी सुनीता मोहिते आणि आय. जी. मुचंडी यांनी मागील कालावधीत केलेल्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी कार्यकारिणी सदस्य गोविंदराव राऊत, अनंत जांगळे, अनंत लाड प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांचीही फेस रिडिंगद्वारे हजेरी; शिक्षकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Spread the love  बेळगाव : शिक्षकांची उपस्थिती कर्तव्य ॲपद्वारे फेस रिडिंगच्या माध्यमातून नोंदविली जात असतानाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *