
बेळगाव : बेळगाव शहरात आज भक्त कनकदास जयंतीचा उत्साह संचारला असून, यानिमित्ताने शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. आज बेळगावात भक्त कनकदास जयंतीचा उत्साहपूर्ण माहोल होता. शहरातील बुडा कार्यालयाजवळील श्री भक्त कनकदास चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला.

महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, कन्नड आणि संस्कृती विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री यांच्यासह अन्य मान्यवरांनी ढोल वाजवून मिरवणुकीला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात, विविध कलापथके आणि वाद्यवृंदांसह निघालेली ही मिरवणूक आर. टी. संगोळी रायण्णा चौक, एस.पी. ऑफिस रस्ता मार्गे शहरातील कुमारगंधर्व कलामंदिर येथे पोहोचली, जिथे तिचे समारंभात रूपांतर झाले. यावेळी माजी महापौर यल्लाप्पा कुरबर, एस. एफ. पुजारी, वसंत दळवाई, सुधीर गद्दे, बागण्णा नरोटी, अशोक सदलगे यांसह समाजातील अन्य बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta