Thursday , March 5 2026
Breaking News

पैशाच्या देवाणघेवाणीतून शहापूर येथे तरुणावर प्राणघातक हल्ला

Spread the love

 

बेळगाव : शहापूर होसुर मठ गल्ली परिसरात पाच हजार रुपयांच्या देवाणघेवाणीतून प्रसाद चंद्रकांत जाधव नामक तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना रात्री 8 च्या सुमारास घडली असून हल्लेखोर तरूणाला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रसाद जाधव याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शहापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *