Thursday , March 5 2026
Breaking News

“कॅपिटल-वन” एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला रविवारपासून

Spread the love

 

बेळगाव : अनसुरकर गल्ली, बेळगाव येथील कॅपिटल वन या संस्थेच्यावतीने सालाबादप्रमाणे एस्. एस्. एल. सी. च्या विद्यार्थ्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. बेळगाव आणि परिसरातील शालेय परीक्षेत अनुक्रमे पहिले पाच क्रमांक मिळविलेले व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्ट्या मागसलेल्या पाच विद्यार्थ्यानां या व्याखानमालेचा लाभ घेता येणार आहे. रविवार दि 16-11-2025 पासून रविवार दि. 21-12-2025 या कालावधीत दर रविवारी सकाळी ठीक 8.15 ते 12.00 या वेळेत भरविण्यात येणार आहेत.
सदर व्याख्यानमालेच्या उदघाटनाचा कार्यक्रम रविवार दि.16-11-2025 रोजी सकाळी 8 वाजता ज्योती महाविद्यालयातील सभागृहात संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
असे संस्थेचे चेअरमन श्री. शिवाजीराव हंडे यांनी कळविले आहे.
एस्. एस्. एल. सी. व्याख्यानमाला वेळापत्रक पुढीलप्रमाणे
दिनांक वेळ विषय
रविवार 16-11-2025 8.15 ते 12.00 मराठी
रविवार 23-11-2025 8.15 ते 12.00 गणित
रविवार 30-11-2025 8.15 ते 12.00 इंग्रजी
रविवार 07-12-2025 8.15 ते 12.00 कन्नड
रविवार 14-12-2025 8.15 ते 12.00 विज्ञान
रविवार 21-12-2025 8.15 ते 12.00 समाज-विज्ञान

संस्थेकडे शाळा मुख्याध्यापकांनी केलेल्या विद्यार्थी विद्यार्थीनींच्या नोंदणी प्रमाणे बहुसंख्य विद्यार्थी या व्याखानमालेचा लाभ घेणार असून सर्व विद्यार्थी वर्गानी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *