
बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ अधिकृत प्रतिनिधीमंडळासह नवी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री बी. झेड. झमीर अहमद खान यांच्यासोबत त्यांनी कर्नाटकातील विकास प्रकल्प, प्रशासकीय समन्वय आणि कल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या बैठकीत मंजूर प्रकल्पांना निधी व प्रशासकीय मंजुरी, विभागीय अंमलबजावणीतील वेग, तसेच बेळगाव उत्तर मतदारसंघातील प्राधान्याच्या गरजांवर विचारविनिमय झाला.
दिल्ली दौऱ्यात आमदार आसिफ सेठ यांनी एआयसीसीचे सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. यावेळी मंत्री झमीर अहमद आणि आमदार प्रसाद अब्बय्या उपस्थित होते. राज्य संघटन बळकटीकरण, सद्य राजकीय घडामोडी आणि कर्नाटकातील सुरू असलेल्या उपक्रमांवर चर्चा पार पडली.
राष्ट्रीय राजधानीतील या संवादातून बेळगाव उत्तरच्या विकासासाठी प्रशासकीय पाठबळ, निधी आणि धोरणात्मक मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार आमदार आसिफ सेठ यांनी पुन्हा अधोरेखित केला.
Belgaum Varta Belgaum Varta