Monday , September 21 2026
Breaking News

ज्योती सेंट्रल स्कूलच्या ‘ज्योतिर्मयी’ मॅगझिनचे प्रकाशन उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे आज शाळेच्या पहिल्या ‘ज्योतिर्मयी’ नामक शालेय मॅगझिनच्या पहिल्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यिक विचारांना व्यासपीठ देण्यासाठी हे नियतकालिक सुरू करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकवृंदात आनंदाचे वातावरण होते. शाळेचे संस्थापक माजी चेअरमन डॉ. पी. डी. काळे यांच्या हस्ते या ‘ज्योतिर्मयी’ मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले.

या प्रकाशन सोहळ्याला संगोळी सर, आर. के. पाटील, आर.एस. पाटील, नितीन घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

त्यांच्यासोबतच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर, शालेय शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे आणि शाळेच्या या प्रयत्नाचे कौतुक केले. मुख्याध्यापिका श्रीमती कंग्राळकर यांनी नियतकालिकाच्या निर्मितीमागचा उद्देश स्पष्ट केला आणि सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *