Thursday , March 5 2026
Breaking News

समिती नेत्यांवरील खटल्याची पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी

Spread the love

 

बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी समिती नेत्यांनी प्रक्षोभक भाषण करून दोन भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत मार्केट पोलिस ठाण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, कै. संभाजीराव पाटील, अरविंद पाटील, विकास कलघटगी, सरिता पाटील, सरस्वती पाटील, गणेश दड्डीकर, रत्न प्रसाद पवार, दिगंबर पाटील, कै. निंगोजी हुद्दार, मदन बामणे, हणमंत मजुकर, राजू बिर्जे, महेश जुवेकर, संजय शिंदे, आर. आय. पाटील, सूरज कणबरकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यावर दुसरे जेएमएफसी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. म. ए. समितीकडून ॲड. महेश बिर्जे, ॲड. वैभव कुट्रे, ॲड. एम. बी. बोंद्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर काम पाहत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कावळेवाडीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील संत ज्ञानेश्वर पारायण मंडळ व भजनी मंडळातर्फे दरवर्षी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *