
बेळगाव : नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘वोट चोर गद्दी छोड’ या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीसाठी बेळगाव ग्रामीण येथून युवा नेता मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण युवा काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
बेळगाव ग्रामीणचे एकूण 50 कार्यकर्ते गोवा येथून विशेष विमानाने दिल्ली येथील महारॅली सहभागी होण्यासाठी पोहोचणार असल्याची माहिती उचगाव ब्लॉक काँग्रेसचे युवा अध्यक्ष व्यंकट पाटील यांनी दिली. यावेळी पद्मराज पाटील, संगणगौडा पाटील, बसवंत कडोलकर, निलेश सावगावकर, निंगप्पा तल्लूरी, प्रणव गोडसे अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta