
बेळगाव : बेळगुंदी येथील एका माध्यमिक हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांनी त्याला यथेच्छ चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि. १२) घडली होती. मात्र, फिर्याद देण्यास विद्यार्थिनीसह तिच्या पालकांनी नकार दिल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर पोलिसांनीच पोक्सोंतर्गत सुओ मोटो गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.
शुक्रवारी घडलेल्या या प्रकरणाचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. ट्युशनच्या बहाण्याने विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न त्या प्रभारी मुख्याध्यापकाने केला होता. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शाळेत दाखल होत त्या मुख्याध्यापकाला चोप दिला होता. यामुळे मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. ही घटना समजताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे व इतर अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची माहिती करुन घेतली. त्यावेळी त्यांनी त्या मुख्याध्यापकाच्या विरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले होते. मात्र, कुणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. ही माहिती बाल कल्याण विभागाला देण्यात आली. त्यांना तक्रार द्या, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनीही तक्रार दिली नाही. तक्रार देण्यास कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे, अखेर ग्रामीण एसीपींनी दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधित मुख्याध्यापकावर पोक्सोंतर्गत सुओ मोटो गुन्हा दाखल केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta