Friday , December 19 2025
Breaking News

१४ व्या कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धा रंगणार उद्यापासून; नाट्यरसिकांना नाट्यपर्वणी

Spread the love

 

बेळगाव : सलग १४ वर्षी कॅपिटल वन करंडकासाठी स्पर्धा दोन दिवस रंगणार आहे. येथील कॅपिटल वन मल्टिपर्पज सोसायटी ही संस्था सातत्याने स्पर्धेचे आयोजन करीत आहे. स्पर्धेसाठी अनुभवी व मातबर अशा परीक्षकांना निमंत्रित करण्यात येते.. यंदाही
प्रमोद काळे – पुणे, सुनिल खानोलकर – मुंबई, वामन पंडीत – सिंधुदुर्ग यांना निमंत्रीत करण्यात आले असून त्यांचा अल्पपरीचय खालील प्रमाणे आहे..

प्रमोद काळे,पुणे

गेली ४५ वर्षे नाटकाशी लेखक, दिग्दर्शक व प्रशिक्षक म्हणून संबंधित. २५ एकांकिका, ७ नाटकांचे लेखन व दिग्दर्शन
महाराष्ट्रीय कलोपासक, जागर संस्थाशी संबंधित महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी ३० वर्षे संबंधित सध्या उपाध्यक्ष अनेक लेखन, दिग्दर्शन पारितोषिके ‘अपूर्णात अपूर्णम’ नाटकाला अ. भा. मराठी नाव्य परिषदेच लेखन पुरस्कार, प्रायोगिक नाटक म.टा. पुरस्कार.
नाट्य कार्यशाळांचे आयोजन अतिथी दिग्दर्शक सुमित्रा भावे, सई परांजपे समवेत यांच्यासह चित्रपट कार्य.

वामन मधुसूदन पंडीत, सिंधुदुर्ग

अनेक रंगभूमीविषयक पुस्तकांची निर्मिती. “रंगवाचा हे नाट्यविषयक त्रैमासिक चालवत असून त्या उत्कृष्ट अंकाचे पुरस्कार लाभले आहेत. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवलीचे कार्य व आता अध्यक्ष, एकांकिका स्पर्धा, नाट्यमहोत्सव, संगीत त्रिसुत्रि कार्यक्रम एकांकिका अभिवाचन, संहिता संग्रह, नाटकघर योजना असे अनेक उपक्रम. साहित्यिकांच्या लेखनावर आधारीत अभिवाचन कार्यक्रमांची निर्मिती, दिग्दर्शन व सहभाग.

सुनील मोहन खानोलकर, मुंबई

– खोट खोट, अडथळा हॅपी बर्थडे, सख्या धावाधाव, आता माघार नाही, वारसदार या नाटकांचे लेखन, अनेक हिंदी मालिकेचे संवाद लेखन. अनेक हिंदी मालिकांचे पटकथा लेखन.

डायल १००, पंचनामा, क्राईम डायरी या मराठी मालिकेचे लेखन व दिग्दर्शन, हॅपी बर्थ डे नाटकाला नाट्यगौरव बक्षीस, क्राईम डायरी या मालिकेस उत्कुष्ठ लेखनाचे बक्षीस, गेली पंचवीस वर्षे एकांकिका व नाटकांचे परिक्षक.

About Belgaum Varta

Check Also

क्रांतिकारी किसान सेनेचा बेळगावच्या सुवर्णसौधवर धडक मोर्चा

Spread the love  बेळगाव : राज्यातील शेतकरी समुदायाने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *