Friday , March 6 2026
Breaking News

संत मीरा इंग्रजी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : अनगोळ येथील जनकल्याण ट्रस्ट संचलित संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
शाळेच्या माधव सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बिंदन पाटील, स्वामिनी प्रज्ञानंदजी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, शाळा सुधारणा समिती सदस्य गौरी देव, निलीमा गाडगीळ, मधुकर गर्लहोसुर, या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती ओमकार भारतमाता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांनी प्रार्थना गायली. त्यानंतर विद्यार्थी प्रतीक हंगरगी याने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय करून दिले.
मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच पाहुणे स्वामिनी प्रज्ञानंदजी यांचे स्वागत ऋतुजा जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार यांनी बिंदन पाटील यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल महत्वपूर्ण माहिती सांगितली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलन करून आत्मज्योती जागृत केली. गौसिया माडीवाले हिने आपल्या मनोगत व्यक्त करताना दहावीच्या विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी शाळेचा आदर्श विद्यार्थी सर्वेश तेवरे व आदर्श विद्यार्थिनी भक्ती कुंभार तसेच क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळेची सर्वोत्तम खेळाडू सुहेल बिजापूरे व दिपा बीडी
सर्वोत्तम हँडबॉल खेळाडू श्रेयश खांडेकर, मनस्वी चतुर.
सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू जीवधन पावशे, अब्दुल्ला मुल्ला, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक वेदांत पाखरे, रोहन करेगार,
यंदाच्या वर्षातील सर्वात ऋतिका हलगेकर, सर्वोत्तम कराटे खेळाडू अमन रायबागकर, तानी बेळगावंकर, राजश्री थोरात, यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
श्राव्या भट्ट हिने गीत सादर केल आदर्श विद्यार्थी भक्ती कुंभार व सर्वेश तेवरे यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छंद, शिस्त, परिश्रम व नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर स्वामिनी प्रज्ञानंदजी यांनी ज्ञान ज्योत जागृत करून आपलं ध्येय साध्य करण्याबाबत माहिती दिली. यानंतर शाळेचे अध्यक्ष श्री परमेश्वर हेगडे यांनी अध्यक्षीय भाषणात शाळेच्या उज्ज्वल परंपरेचा उल्लेख केला, विद्यार्थिनी निरीक्षा खांडेकर हिने आभार मानले शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *