Sunday , July 26 2026
Breaking News

कन्नड भाषेच्या आग्रहाखातर बँक कर्मचारी वेठीस!

Spread the love

 

बेळगाव : बँक ऑफ बडोदा उद्यमबाग शाखेत एक महिला बँक कर्मचारी केरळ वरून मागील वर्षी बदलीनिमित रुजू झाली असून तिला फक्त मल्याळम भाषा अवगत आहे, त्या महिलेला कन्नड भाषा येत नाही या कारणाने कन्नड संघटनेच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात आंदोलन करत कन्नड भाषा बोलण्याची आणि शिकण्याची सक्ती केली. आणि संपूर्ण बँकेस वेठीस धरत गोंधळ घातला. त्या महिलेकडून आणि बँक मॅनेजरकडून जबरदस्ती माफी मागवून घेतली आणि त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर वायरल केला आहे. त्यानंतर तिला कॉल करून त्रास देण्यात येत आहे. महिलेचा पती बाहेरदेशी राहत असल्याने ती भीतीच्या छायेत वावरत असून अशा घटना होत असताना पोलिस प्रशासन अशा संघटनांना आवर घालत नसून फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *