
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील रणकुंडये खून प्रकरणाचा तिढा सोडवण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील नागेश पाटील (वय 31) या युवकाचे घरातून अपहरण करून धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
या खून प्रकरणी आरोपी असलेला प्रमोद पाटील त्याचा भाऊ श्रीधर पाटील, महेंद्र कंग्राळकर, भोमाणी ढोकरे यांना बेळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
खून झालेला नागेश पाटील यांच्या वडिलांनी चार वर्षांपूर्वी प्रमोद पाटील यांना वीस हजार रुपये दिले होते. त्यामुळे नागेशने प्रमोदकडे पैसे परत देण्याची मागणी करत होता. गेल्या दोन वर्षापूर्वीही याच कारणामुळे या दोघांमध्ये मारामारी झाली होती.
एक सारखी पैशाची मागणी करू नकोस असे प्रमोद पाटील याने नागेश पाटील याला सुनावले आले होते. हाच राग मनात ठेवून प्रमोद पाटील याने आपला भाऊ श्रीधर आणि मित्र महेंद्र व भोमाणी याना घेऊन नागेश याचा काटा काढला मध्यरात्री त्याच्या घरी जाऊन त्याचे अपहरण करून त्याचा खून केला होता.
प्रमोद पाटील शनिवारी मध्यरात्री नागेशच्या घरी गेले. कारमधून नागेशचे अपहरण केले व त्याचा खून करून त्याचा मृतदेह त्याच्या घरासमोर टाकून दिला होता. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केवळ एका दिवसातच या प्रकरणाचा छडा लावत चौघांना अटक केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta