खानापूर (प्रतिनिधी): आज सोमवार (दि. 15) पासून हुबळी-दादर एक्सप्रेसचा थांबा खानापूर रेल्वे स्थानकावर अधिकृतपणे सुरू झाला. या योजनेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना, खासदार विश्वेश्वर-हेगडे कागेरी, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. दरम्यान, सोमन्ना यांनी बेळगाव अनगोळ गेट (चौथे …
Read More »हुळंद येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील जंगल भागात वनप्राण्याचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा कधी अस्वलाचा हल्ला तर कधी गवी रेड्याचा हल्ला असे प्राणघातक हल्ले होत असताना रविवारी दि. १४ रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हुळंद (ता. खानापूर) येथील शेतकरी वासुदेव नारायण गावडे यांच्यावर गावापासुन जवळ …
Read More »सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने मंगळवारी बैठक
खानापूर : मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकल मराठा समाज खानापूर तालुका यांच्यावतीने राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ११ वाजता मराठा समाजातील सर्व घटकांना आमंत्रित करण्यात येत आहे. लवकरच कर्नाटक राज्यात जनगणना होत आहे, या जनगणनेत मराठा समाजाने आपली नोंद कशा पद्धतीने करावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. …
Read More »हुबळी-दादर-हुबळी एक्स्प्रेसला सोमवारपासून खानापूर येथे एक मिनिटाचा थांबा
हुबळी : प्रवाशांच्या सोयीसाठी, दक्षिण पश्चिम रेल्वेने १५.०९.२०२५ पासून खानापूर (केएनपी) रेल्वे स्थानकावर ट्रेन क्रमांक १७३१७/१७३१८ एसएसएस हुबळी-दादर-एसएसएस हुबळी एक्सप्रेस गाड्यांना एक मिनिट थांबा दिला आहे. ट्रेन क्रमांक १७३१७ (एसएसएस हुबळी-दादर) १७:५९ वाजता खानापूरला पोहोचेल आणि १८:०० वाजता निघेल. त्याचप्रमाणे, १६.०९.२०२५ रोजी, ट्रेन क्रमांक १७३१८ (दादर-एसएसएस हुबळी) खानापूर येथे …
Read More »शैक्षणिक विकासासाठी सदैव कटिबद्ध : आमदार विठ्ठल हलगेकर
खानापुरात सरकारी विद्यालयात इमारतीचे भूमिपूजन! खानापूर : खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी आमचा नेहमी प्रयत्न असणार आहे. मागील सरकारच्या काळात खानापूर तालुक्यातील दोन सरकारी विद्यालयाच्या विकासासाठी तत्कालीन शैक्षणिक मंत्री सुधाकर यांच्याकडे आम्ही अर्ज विनंती केली होती. त्यानंतर देखील विद्यमान सरकारकडे आपण या दोन महाविद्यालयांच्या इमारत विकासासाठी निधीचा प्रस्ताव केला होता …
Read More »कुळाच्या वादातून दीराने केला भावजयीचा डोक्यात फावडा घालून खून; जोयडा तालुक्यातील घटना
रामनगर : कुळाच्या वादातून दीराने भावजयीच्या डोकीत फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना जोयडा तालुक्यातील शिंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील मालंबा गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी घडली. धोंडू गंगाराम वरक (वय 55) या इसमाने आपल्या भावजय भाग्यश्री सोनू वरक (वय 32) हिला घरासमोरच डोक्यात फावड्याने मारहाण करून ठार केले. घरातील कुळाच्या हक्कावरून …
Read More »जांबोटी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराविरोधात मागासवर्गीय नागरिकांचा मोर्चा
जांबोटी : जांबोटी येथील मागासवर्गीय कॉलनीतील नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा काढत पंचायतीतील भ्रष्टाचाराचा जाब विचारला. मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी मागासवर्गीय खात्यामार्फत आलेल्या विशेष निधीचा वापर न करता परस्पर पैसे लाटल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला. गेल्या पाच वर्षांत मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी गटार बांधकाम, समुदाय भवन दुरुस्ती, सोलार दिवे, विजेची थकबाकी भरणे आदी …
Read More »जांबोटी पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक व सचिव बेपत्ता
खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील पीकेपीएस सोसायटीचे व्यवस्थापक खंडोबा राऊत व सचिव श्रीनाथ खाडे हे अचानक बेपत्ता झाल्याने सोसायटीचे कामकाज ठप्प झाले आहे. या घटनेमुळे सोसायटीच्या दैनंदिन कामकाजावर आणि निवडणुकीत अडथळा निर्माण झाला आहे. यासाठी सोसायटीच्या अध्यक्षा धनश्री सरदेसाई यांनी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार …
Read More »ओलमणी शाळेतील दोन शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव
खानापूर : तालुक्यातील हायर प्रायमरी मराठी शाळा, ओलमणी येथील दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. गुरव (रा. शिवाजीनगर, रामगुरवाडी) यांना श्री दत्त देवस्थान क्षेत्र, आडी-निपाणी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. तर शाळेचे सहशिक्षक एस. टी. मेलगे …
Read More »गुंजी येथे ढोल-ताशाच्या गजरात “गुंजीचा राजा”चे विसर्जन
गुंजी (संदीप घाडी) : खानापूर तालुक्यातील गुंजी येथील सार्वजनिक गणेश “गुंजीचा राजा”ची मिरवणूक ढोल व ताशा अशा पारंपारिक वाद्याच्या गजरात उत्साहात संपन्न झाली. सार्वजनिक श्री गणेश युवक मंडळाचे अध्यक्ष वासुदेव नागो गोरल यांच्या नेतृत्ववाखाली दि. 27 ऑगष्ट रोजी ढोल, ताशा आणि ह.भ.प. महाराज यांच्या भजनाच्या गजरात गावात संवाद्य मिरवणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta